सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (00:05 IST)

नांदेड : गॅस सिलेंडरचा भडका उडून घर जळून खाक

नांदेड शहराजवळील नुसरतपूर गावात गॅस सिलेंडरचा भडका उडून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली असून या स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडात नुसरतपूर गावात जयभीम शिरसाठ  हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. शिरसाठ हे मिस्त्रींचे काम करत असून त्यांनी सहा महिन्यापूर्वी त्यांचे पत्राचे घर बांधले होते. नेहमी प्रमाणे  ते दुपारी कामावर गेले. त्यांची दोन्ही मुले देखील शाळेत गेली. त्यांची पत्नी घरात एकटीच होती. घरात त्या गॅसवर स्वयंपाक करत होती. त्यांना त्यांच्या घराच्या जवळ राहणाऱ्या मावशीचा फोन आल्यावर त्या स्वयंपाक सोडून जवळच्या मावशीच्या घरी गेल्या आणि काही क्षणातच  गॅसचा भडका उडाला. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले मात्र सुदैवाने त्या अपघातातून थोडक्यात बचावल्या. अग्निशमन दलाने तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. 

शिरसाठ यांनी मोठ्या कष्टाने एक एक पाई जमवून पत्र्याचे घर बांधले होते. त्यांच्या पत्नीने देखील कर्ज काढून  साड्यांच्या व्यवसाय सुरु केला. आगीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा घरातील सर्व साहित्ये जळून खाक झाल्यामुळे त्यांच्यावर मोठं संकट आले आहेत. 
 
 
 Edited By - Priya Dixit