सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जुलै 2023 (12:56 IST)

Nashik : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन

Shradhanjali RIP
नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मो.स. गोसावी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते गोखले शिक्षण संस्थेचे सचिव आणि महासंचालक होते. पुण्यातून पदव्युत्तरचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या भियक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम केले.त्यांना वयाच्या 23 व्या वर्षी नाशिकच्या बी वाय के महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचा मान मिळाला. 
 
 
त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना गोखले शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा मिळवून दिल्या. त्यांच्या पश्चात कन्या आणि दोन मुले आहेत. 
 
त्यांचे पार्थिव संस्थेच्या भियक्ष महाविद्यालयाच्या प्रागंणात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
त्यांच्या निधनाची माहिती मिळतातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. 





Edited by - Priya Dixit