मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (23:37 IST)

पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा : वडेट्टीवार

पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 
 
औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागले तर जनतेची कामे होतात. भावाभावांमध्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूजा आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारखा आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या, असं वडेट्टीवार म्हणाले.
 
सत्ता कुणाच्याही पक्षाची आली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं.? आम्ही फक्त बशा धुणारे झालो आहोत. आम्हाला भजे दिले की आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खतायत ना. ज्यांच्यामुळे आपण मंत्री झालो त्यांच्यासाठी खापायला शिकलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.