मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:12 IST)

ना फडणवीस, ना अजित पवार, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, मंदिर समितीचा निर्णय

shinde panwar fadnavis
पंढरपूर :  महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. कार्तिकी एकादशीला  देवेंद्र फडणवीस की अजित  पवार कोण विठ्ठल रखुमाईची पूजा कोण  करणार अशा चर्चांना  उधाणा आले होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समिती कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी भूमिका मंदिर समितीने घेतला  आहे. मराठा समाजाच्या भावना शासनाला कळवण्यात येणार असून  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
 
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. पंढरपुरातही  हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता.
 
मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला  होता. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे.   कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे.
 
राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे  कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस मराठा समाजाच्या भावना पाहता हा मान  कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. या पूजेचा मान कोणाला मिळणार या विषयी अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.
 





Edited By - Ratnadeep Ranshoor