सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (08:10 IST)

निफाड , कांदा चाळीस आग; दोन मोटरसायकल २५ ट्रॅक्टर कांदा आगीत जळून खाक

तालुक्यातील काथरगाव येथे रविवारी दुपारच्या सुमारास वाघ वस्ती वरील कांदा चाळीस आग लागून दोन मोटरसायकल सह सुमारे २५ ट्रॅक्टर कांदा आणि कृषी उपयोगी साहित्य अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत वाघ कुटुंबीयांचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निफाड काथरगाव मार्गावरील वाघ वस्तीवर डॉ. किरण वाघ, राजाराम वाघ आणि काशिनाथ वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. याच ठिकाणी त्यांनी आपल्या शेतातील उत्पादित केलेल्या कांदा साठवण्यासाठी कांदाचाळ बांधलेल्या आहेत. सध्या कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्याने त्यांनी जवळपास २५ ट्रॅक्टर भरून कांदा शाळेमध्ये साठवलेला होता. रविवारी दुपारच्या वेळेस वस्तीवर कोणीही नसताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वस्तीतून धूराचे लोट येताना दिसले. त्यांनी वाघ वस्तीवर धाव घेतली असता तेथील कांदा चाळींमध्ये आग लागली असल्याचे त्यांना दिसून आले. या शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला असल्याने चाळीत साठवलेल्या सर्व कांद्या सहसायकली आणि शेती उपयोगी साहित्य संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आली.