बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 8 जानेवारी 2022 (21:43 IST)

राज्यात सोमवार पासून नाईट कर्फ्यू ; आणखी निर्बंध काय ? जाणून घ्या

राज्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहे. या कारणास्तव प्रशासनाने कठोर पावले घेण्याचे निश्चित केले आहे. या साठी राज्यात येत्या सोमवार पासून राज्यभरात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्यात जिम, स्पा, स्विमिंगपूल पूर्णपणे बंद असणार. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा देखील 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार. ही नियमावली मॉल, मैदाने, उद्याने, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये ,चित्रपट गृहे यांच्या साठी देखील लागू असणार.  
या साठी राज्यात रविवारी मध्यरात्री पासूनच नवे नियम लागू होणार. 
* राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू. 
* मैदाने, पर्यटनस्थळे ,उद्याने बंद राहणार. 
* रात्री 11 ते  सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू  असणार. 
* रेस्टारेंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्याच्या क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरु.
* राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असणार. 
* खासगी कार्यालये 50 टक्क्याच्या क्षमतेने सुरु असतील. 
* खासगी कंपनी मध्ये 2 डोस घेणाऱ्यांना जाण्याची परवानगी.
* लग्नासाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली.
* हॉटेल आणि रेस्टारेंट रात्री 10 वाजे पर्यंत सुरु राहणार.  
* अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
* विमान, रेल्वे वा रस्तेमार्गे राज्यात दाखल होणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना राज्यात दाखल होताना 72 तासांमधला RTPCR रिपोर्ट दाखवणं बंधनकारक.
* UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.
* सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. वर्क फ्रॉम होमचा पर्याय किंवा वेगवेगळ्या कामाच्या वेळांचा पर्याय वापरावा. कार्यालय प्रमुखाने हे निर्णय घ्यावे.