बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (15:08 IST)

नितेश राणे यांना पुन्हा दिलासा, अटकेची कारवाई होणार नाही

भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाची सुनावणी सुरु असल्याने त्यांनी अटक करणार नाही, असे माहिती राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती.
 
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  नितेश राणे हे अद्याप अज्ञातस्थळी आहेत. पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, त्यांची अटक टळली आहे. न्यायालय सुनावणी पुढे ढकल्याने आता पुढील बुधवारपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढील बुधवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. नितेश राणे यांच्यावतीने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी माहिती दिली.