सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:34 IST)

माझ्यावर कुणी प्रेशर आणूही शकत नाही आणि मी कुणाला घाबरत नाही -अमृता फडणवीस

amruta fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. अमृता यांनी गायलेलं गाणं असो वा एखादी राजकीय प्रतिक्रिया; त्यावरून बरंच ट्रोलिंग होतं. अमृता फडणवीसांनी वेळोवेळी ट्रोलर्सला उत्तरेही दिली आहेत. त्यांचा हाच बेधडकपणा, नीडरपणा आज 'लोकमत सखी डॉट कॉम'च्या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाला.
 
माझ्यावर कुणाचाही राजकीय दबाव नाही, माझ्यावर कुणी प्रेशर आणूही शकत नाही आणि मी कुणाला घाबरत नाही, असं अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. 'लोकमत सखी डॉट कॉम'च्या संपादिका मेघना ढोके यांनी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला. 
 
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याची पत्नी इतक्या मोकळेपणाने सोशल लाईफ, सोशल मीडियात वावरताना दिसली, यातली आव्हानं काय होती? कधी कुणी तुम्हाला अडवलं का किंवा वरून काही पॉलिटिकल प्रेशर आले का?, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, "मला घरातून कोणतंही प्रेशर नाही. मी जर कुठे चुकले तर मला घरचे सल्ला देतात आणि मी ते ऐकूनही घेते. त्यानुसार मी बदलही केले आहेत. माझ्यावर कुणाचा राजकीय दबाव नाही आणि मी तो घेतही नाही. परंतु घरच्यांनी मला दिलेला सल्ला नेहमी ऐकते."
Edited by: Ratnadeep Ranshoor