बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (15:53 IST)

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला कुणीही घाबरत नाही : अजित पवार

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला कुणीही घाबरत नाही, ज्यावेळेस एखाद्याला सरकार चालवायचं असतं, त्यावेळेस कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असावी लागते. निवडणुकीला जर आम्ही घाबरलो असतो तर मग विधानसभा अध्यक्षांचा राजीनामाच आम्ही होऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटून नाना पटोलेंनी तिथं राजीनामा दिला. अगोदर त्यांच्या हायकमांडने सांगितलं व नंतर महाविकासआघाडीचे सदस्य म्हणून आम्हा लोकांना ते भेटले आणि मग राजीनामा दिला.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  माध्यमांशी बोलाताना स्पष्ट केलं.
 
विधानसभेत बहुमत असतानाही आपल्याच आमदारांवर सरकारचा विश्वास नाही. असे घाबरट सरकार आतापर्यंत पाहिले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला त्यांनी उत्तर दिल आहे.