बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (16:17 IST)

मेट्रोला विरोध नाही तर आरेतील वृक्षतोडीला विरोध

शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही तज्ञ उपस्थित होते. यावेळी त्यांनी सादरीकरण करत आरेचे महत्त्व पटवून दिले. तिथे सापडलेल्या वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला.मेट्रोला विरोध नाही मात्र आरे कारशेडला विरोध आहे असं सांगताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोणत्याही पायाभूत सुविधांच्या कामांना आम्ही विरोध केला नसल्याचं सांगितलं. आम्ही फक्त विरोधाला विरोध करत नाही नाही असं सांगताना तांत्रिक मुद्द्यांवर फक्त चर्चा होत असून वस्तुस्थितीबद्दल कोणीही बोलत नाही अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.