सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (23:20 IST)

तो पर्यंत काही सांगता येत नाही : फडणवीस

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत. या भेटीबाबत पत्रकारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी परप्रांतीयांचा मुद्द्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, तो पर्यंत काही सांगता येत नाही, अशी भूमिका मांडली.
 
“मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी भेटीनंतर स्पष्ट केलं आहे. नाशिकला भेट झाली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी त्यांना सीडीदेखील पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. युती वगैरे या विषयावर कोणतीच चर्चा झालेली नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधनं नाहीत. राज ठाकरे आणि आमच्या पक्षामध्ये फरक इतकाच आहे की, परप्रांतीयांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे, हा आमच्यातील समान धागा निश्चितपणे आहे. त्यामुळे दुसऱ्या मुद्द्यांचं जिथपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही.”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.