बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (09:40 IST)

आता सौ. फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार पत्नी अमृता फडणवीस करणार आहेत. याशिवाय जिथे गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असं अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये पाच वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी गावाची पाहणी केली. गाव दत्तक घेतल्यापासून येथे अनेक कामं सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे येथील काम पाहण्यासाठी अमृता फडणवीस अधून मधून येत असतात.