अवनी वाघिणीच्या मादी बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश
अवनी म्हणजे टी 1 वाघिण ठार झाल्यानंतर तिच्या दोन बचड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने चार दिवसांपासून मोहीम सुरू केली होती आज दुपारी या मोहिमेला यश आले आहे टी 1 वाघिणीच्या दोन बचड्यां पैकी मादी बचड्यांला वन विभागाच्या टिम ने आज दुपारी जेरबंद केले .
यासाठी मध्यप्रदेशातील चार हत्तीवर बसून पशुवैद्यकीय अधिकारी यानी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहे .सध्या हे दोन बछडे 13 महिन्याचे असून ते सध्या ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे त्यांचा शिकारीसाठी छोटे छोटे बेट वन विभागाने लावले होते त्यानंतर त्या बचड्यांना ट्रेनकुलाइझ करून पकडण्याची मोहीम आता चार दिवस पासून वन विभाग युद्धपातळीवर राबविली250 वन कर्मचारी फौजे सह चार हत्ती ही कामाला लागली होते त्यामुळे आता या मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाल्याने मोहीम काही अंशीं यशस्वी झाली हा भाग उंच-सखल आहे त्यासोबत अनेक ठिकाणी मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदत घेण्यात आली.
अंजी जंगल क्षेत्रात कंपार्टमेंट 655 मध्ये ही मोहीम करण्यात आली सायंकाळी चार वाजता अंजी जंगल परिसरात बेशुद्ध करून पकडले व नागपूर पेंच प्रकल्पात सुखरूप स्वरूपात पोहचवली दुसऱ्या पिल्याचा शोध सुरू आहे त्यासाठी उद्या सकाळ पासून अंजी परिसरात मोहीम तेजीत सुरू होणार आहे .