मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (16:48 IST)

बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन

काही जण खूप हौशी असतात ज्यांच्या हौशेला काहीच मोल नसते .गौतमी पाटील हिच्या लावणीने सगळ्यांनाच वेड लावले आहे. हिच्या लावणीचा कार्यक्रमचे आयोजन काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका गावात पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला करण्यात आले होते. आता साताऱ्या जिल्ह्यातील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी आपल्या बैलाच्या अश्विनच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पैलवान सतीश यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आपल्या बैलावर अश्विनवर खूप प्रेम आहे. अश्विन हा महाराष्ट्र चैम्पियन असून बैलगाडा शर्यतीत  भाग घेतो.अश्विनचा आज तिसरा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. गौतमीच्या aaj  संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाची गावात जय्यत  तयारी  सुरु  आहे. गौतमीच्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  
 
Edited By - Priya Dixit