बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बीड , बुधवार, 6 एप्रिल 2022 (10:02 IST)

नवरदेवाला हवेत गोळीबार करणे खूप महागात पडले

arrest
बीड येथे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईच्या केज रोडवरील मंगल कार्यालयात बालची भास्कर चाटे (साकुड, ता. अंबाजोगाई) या तरुणाने हळदीचा कार्यक्रम होता जेथे शेकडो लोक उपस्थित होते. हळदीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मात्र सोहळ्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बालाजीने मित्रांसोबत डान्स केला. यावेळी बालाजी हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता.
 
 घटना २६ मार्च रोजी अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन मंगल कार्यालयात घडली. बालाजी भास्कर चाटे असे अटक करण्यात आलेल्या नावरदेवाचं नाव असून बाबा शेख असे मित्राचे नाव आहे. दोघेही साकुड येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री सापळा रचून दोघांना अटक केली.