शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:26 IST)

खोट्या सहीनिशी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटी तक्रार नोंदवली : सोमय्या

kirit-somaiya
मुंबईतल्या खार पोलीस स्थानक परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या  खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या हल्लेखोर गुंडांवर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. तसंच खोट्या सहीनिशी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटी तक्रार नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
 
मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन माझा FIR रजिस्टर करण्यास नकार दिला आहे. हे सिद्ध झालं आहे खार पोलीसांनी हे मान्य केलं आहे, की किरीट सोमय्या यांच्या नावावर सही नसलेला FIR मुंबई पोलीस आयुक्तांनी पाठवला होता. तो FIR अधिकृत करुन खार पोलिसांनी कारवाई सुरुवात केली होती असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
 
मुंबई पोलीस आयुक्त कोणत्या प्रकारे चिटिंग करतात हे जनतेसमोर आलं आहे. जो FIR मीडियाला देण्या आला आहे त्या FIR वर किरीट सोमय्यांची सही नाहीए. त्यामुळे तो FIR कायदेशीर नाही, हे खार पोलिसांनी कबुल केलं आहे, खोटा FIR नोंदवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात चौकशी होणं आवश्यक असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.