बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (09:53 IST)

पोलीस भरतीसाठी सराव करताना तरुणीचा मृत्यू

सांगलीत पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना 20 वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाआहे. कोमल दत्तात्रय पवार असं या युवतीचे नाव आहे. विटामधील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर  सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. बळवंत महाविद्यालयाच्या जवळील सुळेवाडी हे कोमलचे गाव. कोमल बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तसंच सध्या ती पोलीस भरतीसाठी मैदानी सरावही करायची.

सरावादरम्यान अचानक कोमलला चक्कर आली आणि ती थेट मैदानावरच कोसळली. मैदानावर सराव करणाऱ्या अन्य खेळाडूंनी तिला तात्काळ उपचारासाठी विटामधील यशश्री रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.