शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (21:13 IST)

धाडसी आजीबाईंचे कौतुक, एका महिलेचा जीव वाचवला

नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे फाट्याजवळ एका कामगार महिलेवर  बिबट्याने हल्ला चढविला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या आजीबाईंनी जोरदार आरओरड केली. बिबट्याच्या डोळ्यांत माती टाकली. या  पराक्रमामुळे एका महिलेला काळ्याच्या तोंडातून सुखरूप बाहेर काढले. आता धाडसी आजीबाईंचे कौतुक केले जात आहे.
 
गोंदे येथील सुरेखा विभुते व शांताबाई शिवाजी रेपूकर. या दोघीही भंगार वेचण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या भंगार वेचण्यासाठी निघाल्या. दोघीही गोंदे फाट्यावरील महामार्गावरुन गोदामाकडे जात होत्या. तेव्हा दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुरेखा विभुते यांच्यावर झडप घातली. त्यांनी प्रतिकार केला. मात्र, त्याचवेळी प्रसंगावधान दाखवत विभुते यांच्यासोबत असलेल्या वयोवृद्ध शांताबाई यांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
 
शांताबाईंनी अगोदर आरडाओरड केली. मात्र, बिबट्या काही केल्या मागे घटत नव्हता. त्यांनी सुरेखा यांना जबड्यात धरलेले. शेवटी शांताबाई धाडसाने पुढे झाल्या. त्यांनी खालची माती हातात घेऊन बिबट्याच्या डोळ्यात टाकली. त्यामुळे तो नमला आणि घाबरून शेपटी घालून त्याने तेथून धूम ठोकली.