नागपुरात रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर पाच हजाराचा दंड
नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणा-या एका कोरोना बाधित रुग्णावर ५,००० चा दंड लावला. हा रुग्ण घराचा बाहेर रस्त्यावर फिरत होता. मनपा आयुक्तांनी नुकतेच निर्देश दिले होते की गृह विलगीकरणाचे पालन न करणा-या रुग्णांवर दंड करा तसेच त्यांना विलगीकरण केन्द्रात पाठवा. त्या अनुसार ही कारवाई करण्यात आली.