रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (23:50 IST)

राज्यात पावसाचा अलर्ट, मुख्यमंत्र्यानी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

eknath shinde
राज्याला पावसाने झोडपले असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. रत्नागिरीत जोरदार पाऊस पडल्याने खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या मुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

खेडच्या बाजारपेठेत पाणी साचले आहे. राजापूरला पुराच्या पाण्याचा धोका आहे. कुंडलिका नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. अंबा, पाताळगंगा, गाढी, सावित्री, उल्हास नद्यांची पातळी वाढली असून नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. 

नदी पात्रातली पातळी वाढता पाहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. नदीलगत गावात, राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सतर्क करणे, त्यांचे स्थलांतर करणे, पावसाच्या परिस्थतीवर लक्ष ठेवणे, आणि खबरदारी घेणे अशा सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.