सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (17:02 IST)

राज इतक्या तासापासून चौकशीला सामोरे, तर आईच्या डोळ्यात अश्रू

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली त्यानंतर आज ते ईडी चौकशीला सामोरे गेले आहेत. राज ठाकरे सकाळी 10.30 वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन निघाले आणि तासाभरात म्हणजेच 11.30 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते, तेव्हा पासून त्यांची चौकशी सुरु असून एकूणच तीन तासा पेक्षा अधिक वेळ राज कार्यालयात आहेत. जेव्हा राज निघाले तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली बोरुडे-ठाकरे हेही ईडी कार्यालया जवळ गेले होते, मात्र फक्त राज यांना आतमध्ये बोलण्यात आले आहे. तर घरातील सर्व ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका खासगी हॉटेल मध्ये थांबले आहेत. मात्र आज जेव्हा आज राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना त्यांना सोडण्यासाठी मातोश्री कुंदा ठाकरेही दरवाजापर्यंत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. तर त्यांनी राज यांचा हात धरला होता आणि राज यांना त्या धीर देत होत्या.