मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जातीय राजकारणावर कडाडले राज ठाकरे, महापुरुष देशाचे की विशिष्ट छातीचे

पुणे येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी जातीय राजकारणावर जोरदार प्रहार केला आहे. राज यांनी राजकीय पक्षांनी सुरु केलेल्या जातीय खेळाला बळी पडू नका असे सुचवले असून, महापुरुष देशाचे असतात ते कोणत्याही जातीचे नसतात असे यावेळी सांगितले.
 
महापुरुषांचीही जातीनिहाय वाटणी करण्यात येत आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे अशी जातीनिहाय वाटणी केली जाते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे आज या महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न पडतो असंही राज ठाकरे म्हणाले. मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उद्ध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उद्ध्वस्त केला त्यांना राम गणेश गडकरी माहित आहेत का ?आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले इंटरनॅशनल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे काढून टाकत आहेत. आज आमचा हा महापुरुष नसता तर आपण कुठे असतो. जर शिवछत्रपती, संभाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास सांगितला नाही तर पुढील पिढीला काय देणार आहोत. भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्याला नाही असा इतिहास महाराष्ट्राला आहे. या इतिहासाचं सरकार काय करत आहे तर किल्ल्यांवर लग्न, समारंभांना परवानगी देत आहेत. असे निर्णय म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे.  
 
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे : 
 
- मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे. 
 
- २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे. 
 
- पुण्याचे खासदार  ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?
 
-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात.
 
-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी  कधी बोलणार?
 
-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.
 
- आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच  तर टाचणी लावायला मी आहेच