मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (23:00 IST)

सगंळ बोललो तर परवडणार नाही असा राणेंचा शिवसेनेला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तीव्र शब्दात वार करत आहेत.  दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सगंळ बोललो तर परवडणार नाही असा थेट इशारा राणेंनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी अधिकारी आणि पोलिसांनाही सज्जड दम भरत कायद्याने वागण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेता सुशांत सिंघ राजपूत प्रकरणावर बोट ठेवून पुन्हा एकदा शिवेसना आणि महाविकास आघाडीवर नारायण राणे यांनी चौकशीवर आरोप केला आहे.
 
 राणेंनी अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध करत मी कुठलाही गुन्हा केला नाही म्हटलंय. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. मात्र काही हरकत नाही आम्ही विरोधी पक्षात असून काय विरोधी राहणार नाही. भविष्यात आमची सत्ता येईल त्यामुळे अधिकारी आणि पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला समोरं जावं लागेल असा दम नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांनाही दिला आहे.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या, दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सगळं बोललो तर परवडणार नाही. दिशा सालियानच्या प्रकरणातील आरोपी मिळाले नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागलात तर सगळं बोलावं लागेल अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.