शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (08:21 IST)

सामनामध्ये प्रसिध्द होणा-या उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीचा ट्रिझर रिलीज

uddhav sanjay
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा ट्रिझर ट्विटरवर पोस्ट केला आहे. २६ व २७ जुलैला ही मुलाखत प्रसिध्द केली जाणार आहे. शिवसेनेमध्ये पडलेली मोठी फुट, सत्ताबदल व शिवसेनेची पुढील वाटचाल यासारखे अनेक प्रश्न सामन्यांना पडले आहे. त्यामुळे या मुलाखतीत उध्दव ठाकरे हे सविस्तरपणे बोलणार आहे. या मुलाखती अगोदरच त्याची मोठी चर्चा आहे.संजय राऊतांकडून हा ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या  टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे  शब्द ऐकायला मिळत आहे. या टिझरमध्ये धनुष्यबाण कोणाचा? ठाकरेंना शिवसेना खरी का खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहे असे रोखठोख प्रश्न विचाारण्यात आले आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या टिझरने मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे. त्यातच राऊत यांनी ट्रिझर ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे त्याची चर्चा अधिक रंगली आहे.