शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (07:50 IST)

ब्लॅकमेल करुन अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल

rape
नाशिक  ब्लॅकमेल करीत एकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात बलत्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुषण शेवाळे (२१ रा. आशापुरी हौ.सोसा,सरस्वतीनगर) असे संशयिताचे नाव आहे. मानेनगर भागात राहणा-या अल्पवयीन मुलीचा नंबर मिळवित संशयिताने तिला व्हॉटसअप आणि टेक्स मॅसेज करीत ब्लॅकमेलिंग करून वेळोवेळी बलात्कार केला. एप्रिल २०२१ ते २९ जुलै २२ दरम्यान संशयिताने मुलीच्या घरी व परिसरातील टर्फ क्रि केट ग्राऊंड भागातील मोकळया प्लॉट मध्ये घेवून जात हे कृत्य केले.

मोबाईलच्या माध्यमातून संशयिताने प्रथम ओळख वाढविली. त्यानंतर जवळीक साधत त्याने गेली वर्षभर ब्लॅकमेलिंग केले. संशयिताचा अत्याचार वाढल्याने मुलीने आपल्या आईकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.