शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (07:50 IST)

उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का? -आदित्य ठाकरे

aditya thackeray
आदित्य यांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची टीका करत प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. आता, पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. मेट्रो लाईन ६ साठी उभारण्यात येत असलेल्या कारशेडच्या जागेवरुन आदित्य यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, कांजुरमार्गमधील कारशेडसाठी १५ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. मग, उरलेली जागा कोणाच्या घशात घालणार? असा सवाल आदित्य यांनी विचारला आहे.
 
मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना आरे कारशेडला विरोध करत, आरेचं जंगलं वाचलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकारने शपथ घेतली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरेतच कारशेड उभारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तो वाद सुरु असतानाचा आता आदित्य यांनी मेट्रो लाईन ६ साठी कांजूरमार्ग येथील जागेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor