मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (15:30 IST)

सातारा : जवान अनिल कळसे शहीद

मणिपूरमध्ये देशसेवा बजावत असताना कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावचे सुपुत्र जवान अनिल कळसे शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी रेठरे खुर्द येथे आणण्यात येईल. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
जवान अनिल कळसे हे मणिपूर येथे सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. त्यांच्या अंगावर झाड कोसळ्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह रेठरे खुर्द पंचक्रोशी शोकसागरात बुडाली.
 
अनिल कळसे हे 29 सप्टेंबर 2000 रोजी सैन्यदलात भरती झाले. 2017 साली ते सैन्यातून निवृत्त झाले परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली. ऑगस्ट 2024 मध्ये ते सेवेतून निवृत्त होणार होते. सध्या ते बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील 267 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.