गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (09:30 IST)

रुक्मिणी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘रुक्मिणी’ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

गेल्या दशकात कृषी व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व लकल्याण, पत्रकारिता, प्रशासन, कला व क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० वर्षे वयापर्यंतच्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक महिलांनी स्वतःच्या पासपोर्ट आकराच्या फोटोसह आपल्या कार्याची संपूर्ण माहिती, फोटो, वृत्तपत्र कात्रणे, दृक-श्राव्य रेकॉर्डिंग इत्यादीसह आपला प्रस्ताव दिनांक २२ मे २०१८ पर्यंत विद्यापीठाकडे पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : डॉ. विजया पाटील,प्रभारी प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - ४२२ २२२. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७, ९४०३७७४६१७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.