शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साईच्या दान पेटीत एक कोटींची वाढ

साई समाधी शताब्दीच्या सुरवातीलाच ९९ व्या पुण्यतिथी उत्सवात भाविकांनी सार्इंना ४ कोटी ७१ लाखांचे दान दिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात एक कोटींनी वाढ झाल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे. 
 
यामध्ये दक्षिणा पेटीत २ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये, देणगी कक्षातून १ कोटी १० लाख ४९ हजार रुपये, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून ३५ लाख ३८ हजार, तर आॅनलाइनच्या माध्यमातून सुमारे २५ लाख ७६ हजारांचे, तर धनादेशांद्वारे सुमारे २९ लाख ३९ हजार असे एकूण ४ कोटी ५३ लाख ६५ हजारांचे दान मिळाले. दक्षिणापेटी व देणगी काउंटरच्या माध्यमातून सोन्याच्या रूपाने ४८० ग्रॅम वजनाचे १२ लाख रुपयांचे सोने, तर २ लाख ८० हजारांची ९ किलो ३५२ ग्रॅम चांदी, तसेच परकीय चलनाच्या माध्यमातून देखील सार्इंच्या झोळीत दान मिळाले आहे. यामध्ये एकूण सोळा देशांचे दान जमा झाले. त्या माध्यमातून ३ लाख ३६ हजारांचे दान साई संस्थानास मिळाले. यात अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांचे चलन आहे. तर सशुल्क दर्शनाचे सुमारे ३२ हजार पास जनसंपर्क कार्यालयाकडून वितरित करण्यात आले असून, त्याद्वारे ६८ लाख रुपये मिळाले.