मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (21:41 IST)

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल अटळ

राज्य सरकारचं खाते वाटप जाहीर झाले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थ व नियोजन खाते देण्यात आले आहे. या खातेवाटपानंतर संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांना प्रतीक्रिया दिली.महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल अटळ आहे. अजित पवारांना अर्थखाते नाहीतर मुख्यमंत्री (CM) पद मिळणार अस वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं. अजितदादा भविष्यात मुख्यमंत्री होणार हे मी वारंवार सांगत असतो. मी जेव्हा असं वारंवार सांगतो तेव्हा घडत असतं.माझ्याकडे संकेत असतात असेही ते म्हणाले आहेत.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खात्या-पित्या खात्यावरून काही वाद सुरु आहे. मात्र ही खाती अजित पवार यांच्या गटाला मिळणार आहेत. कारण तेवढी त्यांची ताकद आहे. बाकीच्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं हेच मोठ आहे. याचही मोठ कारण आहे. कारण त्यांना शिवसेना फोडायची आहे.यावेळी शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले की, गुलामाचा पट्टा बांधायचा ठरवला तर या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Edited By - Ratnadeep Ranshoor