मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (08:26 IST)

288 मतदारसंघांत होणार ‘सावरकर गौरव यात्रा’,कसे असेल यात्रेचं स्वरुप

Chandrashekhar Bawankule
भाजप आणि शिवसेना 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. या यात्रेत सर्व नेते, पदाधिकारी, बूथ कमिटीचे सदस्य सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी राहुल गांधीवर सडकून टीका केली. ‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मोठं योगदान आहे. हे नाकारुन चालणार नाही. सावरकरांचं हे योगदान १३० कोटी भारतीय कधीच विसरु शकत नाहीत असेही ते म्हणाले.
 
स्वातंत्र्यवीर सावकर गौरव यात्रेचे असे असणार स्वरूप
-288 विधानसभा मतदारसंघात ही यात्रा चालणार
-30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत यात्रेचं आयोजन
-प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान दोन शहरात कार्यक्रमाचं आयोजन
-मुंबईत विक्रांत पाटील, संजय उपाध्याय यांच्यावर यात्रेची जबाबदारी
-कोकण आणि ठाण्यात निरंजन डावखरे, नितेश राणे यात्रेचं काम पाहणार
-पश्चिम महाराष्ट्रात मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर यांच्यावर जबाबदारी
-उत्तर महाराष्ट्रात जय़कुमार रावल, विजय चौधरी यांच्यावर य़ात्रेची जबाबदारी
-मराठवाड्य़ात संभाजी निलंगेकर, संजय केणेकर यात्रेचं काम पाहणार
-भाजप आणि शिवसेना यांचा संयुक्त उपक्रम
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही ठिकाणी सहभागी होणार.
 
Edited By - Ratnadeep ranshoor