शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अमरावती , शुक्रवार, 13 मे 2022 (08:11 IST)

मला कुणी समजून घेत नाही म्हणत, 14 वर्षीय मुलीनं केली गळफास घेऊन आत्महत्या

suicide
अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एका 14 वर्षीय चिमुकलीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली आहे. मला कुणी समजून घेत नाही असं लिहून तिने स्वतःला कायमच संपवलं आहे. ओंकारखेडा गावात ही 14 वर्षीय तरुणी राहत होती. नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या तरुणीने घरात कुणीही नसताना राहत्या घरात गळफास लावला.
 
दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये तणावाचं प्रमाण वाढत जाताना दिसतंय. यातुनच अत्यंत कमी वयात ही मुलं मानसिक तणावाला बळी पडतात. अशातूनच अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात मुलं आत्महत्येसारखी पावलं उचलत आहेत. अमरावतीमध्येही हा असाच प्रकार समोर आला आहे. आपलं म्हणणं कुणीही एकून घेत नाही असं म्हणत या 14 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं.
 
नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तर या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे..पोलिसांनी मात्र युवतीने लिहलेली मृत्यू पूर्वी चिठ्ठी माध्यमांना देण्यास नकार दिला.