रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (08:45 IST)

विनायक राऊतांच्या समोर भावना गवळींना पाहून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची जोरदार घोषणाबाजी

bhawana gavali
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अकोला रेल्वे स्थानकावर एकाचवेळी आले होते. यावेळी भावना गवळींना पाहून ठाकरे गटाने गद्दार, गद्दार अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

दोन्ही खासदार विदर्भ एक्स्प्रेसने दोन्ही खासदार मुंबईकडे निघाले होते. यावेळी विनायक राऊत यांना सोडण्यासाठी काही कार्यकर्ते, पदाधिकारी रेल्वेस्थानकावर आले होते. तर त्याच्या शेजारच्याच डब्यातून भावना गवळी उतरून पुढच्या डब्यात जात होत्या. विनायक राऊत कार्यकर्त्यांना हाताने निरोप देत असताना भावना गवळीकडे काहींचे लक्ष गेले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुलडाण्यातील सभेच्या नियाेजनासाठी आलेले शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी बुलडाण्यात आढावा घेतला. त्यानंतर ते संध्याकाळी अकाेल्यात येऊन विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकाेला स्थानकावर आले हाेते त्यांना निराेप देण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी माेठी गर्दी केली हाेती, स्थानकावर गाडी आल्यानंतर राऊत हे गाडीच्या दरवाज्यात उभे राहून शिवसैनिकांना नमस्कार करत असतानाच त्याच गाडीने मुंबईला जाण्यासाठी वाशीमच्या खासदार भावना गवळी स्थानकावर आल्या. त्यांच्याकडे पाहत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार गद्दार,इडी अशा घाेषणा देत एकच गदाराेळ केला. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor