सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 जानेवारी 2023 (16:57 IST)

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शेकापचे नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेडचे ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी शेकापचे नेते केशवराव धोंडगे यांचे आज औरंगाबाद येथे वयाच्या 102 वर्षी निधन झाले. ते गेले काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना श्वसोच्छ्वासाचा त्रास झाल्यामुळे औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीर्घ काळापासून आजाराशी झुंज देत अखेर आज त्यांची प्राण ज्योत मालवली. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ अशी त्यांची ओळख होती. नांदेडच्या कंधार येथे ते सहावेळा आमदार आणि एक वेळा खासदार होते.त्यांना तीन महिन्यांपूर्वी विधिमंडळात गौरवान्वित करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता असे ते प्रसिद्ध असून त्यांची विधानसभेतील भाषणे प्रचंड गाजली.   
 
कंधार तालुक्यातील गऊळ गावात त्यांचा जन्म झाला. सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलन केले. निर्भीड आणि स्वाभिमानी प्रामाणिकपणाचा बाणा त्यांनी जपून ठेवला. त्याचे वैशिष्ठ्य असे की ते विधानसभेचं काम सुरु होण्यापूर्वी सभागृहात हजर असायचे आणि कामकाज संपल्यावर शेवटी निघायचे. 1985 साली गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य होण्याचा मानही त्यांना मिळाला.

Edited By- Priya Dixit