बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (16:40 IST)

सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करण्यात आली असून राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म सम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती असून मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी मनसेकडून मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आल्याचं दिसत आहे. या पोस्टरवर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं लिहिण्यात आलं आहे. मनसेची पोस्टरबाजी महत्त्वाचं म्हणजे या हे पोस्टर भगव्या रंगात असल्याने मनसे भाजपासोबत युती करण्याच्या तसंच भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
 
या पोस्टरसंबंधी बोलताना मनसेचे सरचिटणीस यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव तसंच रजा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. तोच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे”. यावेळी त्यांनी कोणालाही डिवचण्याचासाठी हे पोस्टर लावण्यात आलं असून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं स्पष्ट केलं.