शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही- दिलीप वळसे-पाटील
पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.
“शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात,” अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या.”
Edited By - Ratnadeep ranshoor