शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (16:40 IST)

शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज नाहीत आणि महाविकास आघाडीत मतभेद नाहीत :अजित पवार

कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध काही पुरावे असल्यास कारवाई केली जाईल. पण पुराव्याशिवाय काहीही केलं जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोणालाही वाचवलं जाणार नाही. शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज नाहीत आणि महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. 
 
सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि स्फोटकांची स्कॉर्पिओ या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये दोषी जे कोणी असतील त्यांना शासन पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. परंतु चौकशीमध्ये निष्पन्न होण्याच्या आधी निर्णय घेणं उचित ठरणार नाही अशी भूमिका आमची आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
 
सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, चौकशीनंतर योग्य कारवाई केली जाईल. सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, दोषींवर कारवाई केली जाईल, असं अजित पवार म्हणाले. सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील. तसंच महाविकास आघडीच्या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध काही पुरावे असल्यास कारवाई केली जाईल. पण पुराव्याशिवाय काहीही केलं जाणार नाही, असं अजित पवार म्हणाले. कोणालाही वाचवलं जाणार नाही. शरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज नाहीत आणि महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, असं अजित पवार म्हणाले.