मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली.  या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पवार आणि  बीजू जनता दल पक्षाच्या बैठकीत  तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. 
 
नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ३ राज्यात यश मिळाले. दरम्यान, या यशामुळे आता काँग्रेसच्या विरोधकांचे मनोबल उंचावलं असून, बैठकांना सुरुवात झाल्याची चर्चा होते आहे. सध्या पवारांच्या निवासस्थानी सुरु असलेली बीजू जनता दल पक्षाची बैठकही याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे. पाच राज्यातील निवडणुकांमधीलकाँग्रेसच्या यशानंतर बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी राहुल गांधींचे अभिनंदन केले होते.