सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (12:41 IST)

शरद पवार आघाडी सरकार वाचविण्यासाठी मैदानात, दिल्ली जाणार

sharad panwar
मंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह माविआच्या विरोधात बंड पुकारला आहे. शिवसेनेचे 38 आमदार वेगळे झाले असून एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे तळ मांडला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला असून राज्यात आघाडी सरकार अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. या मुळे काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेगळे वळण आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सह सरकार नको असल्याची भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता माविआ सरकार याला वाचविण्यासाठी मैदानात उतरले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी आघाडीतील काही नेते पोहोचले आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा हे उमेदवारीअर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहे.