शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (08:07 IST)

शशिकांत मोरे शिवसेनेत दाखल रत्नागिरीत भाजपला धक्का;

भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या भांडूप (पूर्व) येथील मैत्री बंगल्यात त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. 
रत्नागिरी जिल्ह्यात  त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला खिंडार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आश्वासनावर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पेट्रोल- डिझे- गॅस सिलिंडरचे वाढते भाव हे पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधकांचे नामोहरम करण्यासाठी ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गरवापर देखील केला जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल असा विश्वास मोरे यांनीव्यक्त केला आहे.