शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (14:32 IST)

पतीला बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप वाचवले

सावित्रीने यमराज कडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण वाचविले आपण ऐकलेच आहे. जगात अशा अनेक बायका आहे जे आपल्या पतीचे जीवन वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील करत नाही आणि येणाऱ्या संकटाला सोमोरी जातात. असेच आजच्या आधुनिक काळात देखील आपल्या पतीचे प्राण वाचविणारी सावित्रीने आपल्या पतीची सुटका बिबट्याच्या तावडीतून करून त्याचे प्राण वाचवले आहे.

अहमदनगर जिल्हयात पारनेर तालुक्यात दरोडी चापळदरा येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या गोरख पावडे यांच्यावर एका बिबट्याने हल्ला केला आणि त्यांचे डोकं जबड्यात धरून ठेवले. तर यांच्या धाडसी पत्नीने त्यांची बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप सुटका केली. संजना पावडे असे या धाडसी महिलेचे नाव आहे. 
 
घटना सोमवारच्या मध्यरात्रीची आहे. रात्री पावडे दांपत्य झोपले असता गोरख यांना गोठ्यातुंन जनावरांचा आवाज आला. ते आवाजाच्या दिशेने गोठ्याकडे गेले असता गोठ्यात बिबट्या शिरला होता. त्याने गोरख यांचावर हल्ला केला त्यांचे डोके आपल्या जबड्यात धरून ठेवले. गोरख यांनी सुटक्यासाठी आरडाओरड केली असता त्यांचा पत्नीला संजनाला त्यांचा आवाज ऐकू आला आवाजाच्या दिशेने धावत गेल्यावर तिच्या अंगावर काटाच आला. तिने एक क्षण विलंब न करता प्रसंगावधान राखून बिबट्याच्या पोटावर ठोसे मारण्यास सुरुवात केली.

शेवटी तिने बिबट्याची शेपटी ओढली. त्यांच्या कडे कुत्रा असून कुत्र्याने आपल्या मालकाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी बिबट्याच्या गळ्याला चावला. तेवढ्या गोरख चे वडील आले आणि त्यांनी बिबट्यावर दगडफेक केली. अचानक झालेल्या हल्याने बिबट्याने गोरख याला सोडले आणि तिथून पळ काढला.

गोरख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचार साठी नेण्यात आले. अशा प्रकारे आपल्या जीवाची  पर्वा ना करता या आधुनिक सावित्रीने आपल्या पतीचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले. संजनाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.