बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (15:27 IST)

शिंदे यांनी केला आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट करत खळबळ उडवून दिलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला. तसेच या शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, या गोष्टीकडेही त्यांनी ट्विटमधून लक्ष वेधले आहे.
 
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.