गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (14:18 IST)

शिवसेना दसरा मेळावा होणार?

पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गतवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न घेता आवश्यत ती खबरदारी घेऊन हा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून केवळ 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यावेळी हा मेळावा जाहीर होणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्याबाबत तयारी सुरु आहे.

'मिशन बिगेन' अंतर्गत अनेक गोष्टींवरील बंधने शिथिल करण्यता आली असली तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध आहेत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याची  उत्सुकता आहे.