शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:50 IST)

तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राच काही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा असं रुपाली पाटील यांनी सांगतिले. तसेच राज ठाकरे विनंती करत नाही तर थेट जाळ काढतात असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे. 
 
याआधी कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं.