बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (12:57 IST)

Solapur : फेसबुकवर पोलिसाची स्टेटस ठेऊन आत्महत्या!

death
सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

विकास गंगाराम कोळपे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेत विकास गंगाराम गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. 
हा पोलीस कर्मचारी सोलापूरच्या जिल्हा कारागृहात गार्ड आहे. त्याने शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःला श्रद्धांजली देत असल्याचे स्टेटस लावले त्यात त्याने 'भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' लिहून आपली जन्म व मृत्यू तारीख लिहिली आहे. 

तसेच त्याने मी मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याने स्वतःला कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तीन गोळ्या झाडून संपवण्याचा प्रयत्न केला .या घटनेमुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
Edited by - Priya Dixit