रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (08:36 IST)

आठवले यांना अनिल देशमुखांकडून ट्विटरवरून खास शुभेच्छा

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, अनिल देशमुखांनी ट्विटरवरून दिलेल्या या शुभेच्छा खास आहेत कारण त्या त्यांनी आठवले स्टाईलनेच दिल्या आहेत.
 
रामदास आठवले हे राजकारणी तसेच उत्स्फुर्त कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांची यमक जुळवण्याची क्षमता इतकी प्रभावी आहे की त्यांच्या कवितांमुळे संसदेसारख्या स्थळीही हाशा पिकतो. २५ डिसेंबरला त्यांच्या वाढदिवस असतो. याचेच औचित्य साधून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना ट्विट करुन त्यांच्याच शैलीत शुभेच्छा दिल्या.
 
त्यांनी आठवलेंचा एक फोटो शेअर करत
'बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!