रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (08:52 IST)

साईनगर शिर्डी ते दादर विशेष साप्ताहिक गाडी सुरु

साईभक्तांसाठी मध्य रेल्वेच्यावतीने रविवारपासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. 

गाडी क्रमांक २२१४७/ २२१४८  दादर  ते साई नगर शिर्डी शुक्रवारी दादरहून रात्री २१.४५ ला सुटून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता शिर्डीला पोहोचणार शिर्डीहून दादरसाठी ही गाडी शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटून दुपारी ३.२० ला दादरला पोहोचणार आहे.