1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 23 मे 2024 (14:30 IST)

पुणे पोर्श कार अपघात, अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचे काय आहे छोटा राजन कनेक्शन?

pune accident
पुण्यामधील कल्याणी नगरमध्ये जलद गतीने जाणाऱ्या कार ने 2 सॉफ्टवेअर इंजिनियर्सला चिरडले होते. तसेच अल्पवयीन आरोपीला लगेच जामीन मिळाल्यामुळे झालेल्या चर्चेनंतर किशोर न्याय बोर्डाने आरोपीला 5 जून पर्यंत नजरकैद केंद्रात पाठवले आहे. तर सत्र न्यायालयाने आरोपीच्या वडिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  
 
आता आणखीन एक माहिती समोर आली आहे. या अल्पवीयन आरोपीच्या कुटुंबाचे संबंध आता अंडरवल्डशी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समजले की, आता फक्त अल्पवयीन आरोपीचं नाही तर त्याचे वडील आणि आजोबाचे कनेक्शन  अंडरवल्ड डॉन छोटा राजन याचसोबत आहे. एक प्रॉपर्टी वाद नष्ट करण्यासाठी आरोपीच्या आजोबाने या डॉन ची मदत घेतली होती. तसेच आरोपीचा आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यावर हत्या प्रकरणात केस दाखल झाली आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik