शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 7 डिसेंबर 2022 (23:25 IST)

अमरावतीत एसटी बसचा अपघात बस हवेत लटकली

st buses
अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे. अमरावती -नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस नांदगाव पेठच्या उड्डाण पुलावरून कोसळताना बचावली आहे. हा अपघात अमरावती- महामार्गावरील कठड्याला बस धडकल्याने अनियंत्रित होऊन उड्डाण पुलावरून खाली कोसळताना बचावली. प्रवाशांनी भरलेली ही बस बऱ्याच वेळ हवेत लटकून होती. प्रवाशांमध्ये अपघातानंतर भीतीचे वातावरण होते. सुदैवाने थोडक्यात प्रवाशी बचावले आहे. काहींना किरकोळ जखमा झाल्याचे वृत्त आहे. 

 Edited by - Priya Dixit