शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (20:37 IST)

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाकडून दखल

abdul sattar
राज्याच्या महिला आयोगाने अब्दुल सत्तारांच्या सुप्रिया सुळे यांच्या बद्दल दिलेल्या आक्षेपार्ह विधानाची महिला आयोगाकडून दखल घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यात दिसत आहे. राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झाल्याअसुन सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणी राज्यातील महिलाआयोगाकडून दखल घेतली असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य मुळे सत्तार यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. त्यांच्या मुबई आणि औरंगाबादातील घरांवर दगडफेक करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे. ठिकठिकाणी प्रदर्शन होत आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात तीव्र विरोध होत आहे. 

 Edited by - Priya Dixit